एक थेंब दर्शनाचा
शामनिळे रूप तुझे
कल्पिले या नयनात
जणू बरसले कृपामृत
या मन मंदिरात
प्रेमबीज पेरियले तू
अशा बरड मनात
अम्बज्ञ रोप उगविले
शिंपडूनि उदीप्रसाद
एक थेंब दर्शनाचा
मजलागी घडो देवा
दिव्य तुझा तेजाने
होवूदे अम्बज्ञ पुन्हा
न मागणे अफाट
न आस सागराची
तहान ती अल्प
एक थेंब दर्शनाची
कृपा बरसावी पुन्हा
हे अम्बज्ञ देवीसिंहा
चरण कमळ सुगंध
मज द्यावा पुन्हा
-अभिजीतसिंह जोशी
Mast ambadnya
ReplyDelete