Poem : बापू, वाढदिवसाच्या खूप खूप खूप गोड शुभेच्छा !



दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला एक गोष्ट नक्की नक्की जाणवते
बाकी काही कळत नाही, पण तुझे प्रेम मात्र सतत वाढत राहते
तू धरलेल्या माझ्या हाताच्या बोटाची पकड घट्ट होत जाते
कितीही वेळा कान पिळलास तरी ते परत हवेहवेसेच वाटते
तुझ्या सतत दिशा दाखवणार्‍या हाताची वेदना किती असते?
दुसर्‍या हाताने कुशीत घेतोस, तेव्हा ती जाणीवही विरून जाते
तुझ्या सतत धावणार्‍या पायांना काट्यांची कधीच परवा नसते
बाळांच्या वाटेतील काट्यांना वेचण्याची मात्र तुला भारी हौस असते
बाळांना परतपरत संधी देण्यामध्ये तुला गैर कधीच वाटत नसते
मात्र चुकांची आम्हाला जाणीव असावी एवढीच माफक इच्छा असते
"मी खडूस बाप आहे" ह्या विधानाला आमची कधीच संमती नसते
कारण तू किती प्रेम करतोस ह्याची तुला तरी कुठे कल्पना असते?
आजच्या दिवशी फक्त "आय लव्ह यु माय डॅड" म्हणावेसे वाटते
कारण ह्यापेक्षा दुसर्‍या "गिफ्ट"ची तुला कधीही अपेक्षाच नसते
बापू, वाढदिवसाच्या खूप खूप खूप गोड शुभेच्छा ! 

हरि ॐ ! श्रीराम ! अंबज्ञ !

- अजितसिंह पाध्ये

Comments