poem : जीवन केलंस असं सुबक (by Santoshsinh Rane)


माझ्या जीवनाची सुगड
तूच भरिलीस भारंभार
मातीच्या ह्या गोळ्याला
दिलास आधि आकार

उजाड जीवनाचं शिवार
नापिकतेनं त्रस्त होतं
शताक्षीचं प्रेम त्यात कुणीतरी
अनंतहस्ते भरत होतं

जाणीव नव्हती मला कसलीच
तिळापरी कुणीतरी स्नेह देत होतं
मी मात्र माझा मी गिरविताना
गुळाच्या ओढीपरी त्याच्याकडे ओढत होतं

स्वच्छंद दुनियेस समजून
पंतगापरी माझाच मी स्वतंत्र उडत होतो
जाणिवेचा मांजा तुझ्याच हाती
हे काही मी जाणत नव्हतो

प्रारब्ध सामोरी कापण्यास मजला
ह्याची तुलाच होती भिती
क्षमा करण्यास सांगूनी आईस
वळविलास सुबक लाडू तुझ्याच हाती

मकर राशीत प्रवेश करण्या
सूर्याची ती अखंड भ्रमंती
त्रिविक्रमा! प्रदक्षिणा अर्धांगिनीची 
करुनी घेसी तू मंगलचण्डिका प्रपत्ती 

सुपिकतेने भरली सुगड
तुझ्या हाताची घट्ट पकड
जीवन केलंस असं सुबक
जणू प्रपत्तीचं भरलं तबक

घडविलास मजला अखंडतेने
जणू तिळा गुळाच्या गोडीने
न्हाऊ बापू तुझ्याच प्रेमे
तुझ्याच गोड गोड कृपेच्या ओढीने

 - अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे



Comments