Poem : तूच घडवून घे भक्ति तुझी (by Ketakiveera Kulkarni)




बापू...
रस्ता निवडतो मीच आडवाटेचा
अन त्यातही अनवाणीच चालु लागतो मी
धड रसत्याकडे त्या लक्षही नसते  नीट
मग पायात काच घुसल्यावर, का रे दोष देतो तुलाच मी?

प्रत्येक वेळी संकटकाळी
तुलाच जबाबदार ठरवतो मी
पण आमच्या प्रारब्धामुळे जेव्हा तू असतोस आजारी
तेव्हा मग स्वतःलाच दोषी का रे मी मानत नाही?

बाप्पा...
सुख दुःखाचे पारडे माझे
मला कधी धरता आलेच नाही
अन त्यासाठी हनुमंताला ही
साद घालता कधी आलीच नाही

तुझ्या नामाचा दोरखंडही
मी कधीच धरला नाही
अन त्यामुळे तुझ्या कृपेचा रहाटही
कधीच वापरु शकलो नाही मी

गरज आणि ध्येय ह्यामधेही
नेहमी गल्लतच करत आलो मी
तुझी माझ्यासाठीची योजना
कधीच जाणू शकलो नाही मी

बाप्पा..
आता तूच घडवून घे भक्ति तुझी
तुझ्या ह्या अज्ञानी बाळाला दूर लोटू नकोस कधी
पाऊल वाकडे पडले जरी कधी
तर तिथेच हात धर मला अडवण्यासाठी

मीच निर्माण केलेल्या काळोख्यात
वाट दाखव तूच प्रकाशाची
आणि काहीही झाले तरी
तुझ्या चरणांशिच ठेव तू मला बांधुनी

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback