Posted by
Aniruddha Kaladalan
on
- Get link
- X
- Other Apps
त्या कोवळ्या कोवळ्या दिसांची
वाट होती पाहिली
उखर जागेच्या भूमीवर
अनिरुद्ध कृपेची बाग फुलली
शाळेतल्या त्या बाळांची
शाळा इथेही भरली
आज्जीबाईंच्या थरथरत्या मुखावरल्या
पापणीची कडा झाली ओली
मिळणार इथे सारं काही
ह्याची नक्की होती ग्वाही
पण भेटणार आज दादा, आई
पाहणार होते ह्याच डोळा ह्याच देही
इवल्या इवल्या बाहुल्यांचा तो
स्पर्शच वेगळा होता
आई-दादांसंगे सुखावणाऱ्या क्षणांचा
तो हर्षचं निराळा होता
भाकर तुकडा रोजचाच नवा
कधी कोरड्या भाताचा
पानात पडला घास भरभरुनी
अन्नपुर्णेच्या हाताचा
देणाऱ्याने दिले भरभरुनी
भरले गाठोडे, फिरल्या नजरा
आले होते मनही भरुनी
पुन्हा वळताना हिरमुसला चेहरा
मस्तकावरल्या टोपीखाली
लाभली सुखाची छत्र छाया
ऐंशी-नव्वद वयाची तरीही
आईच्या स्पर्शाने उजळली काया
खाऊ, औषधं, बांगडया, कपड्यांनी
भरल्या गाठोड्यात तुझी लाभेवीन माया
बाग फुलाविण्या जीवनाची या!
पुढल्या वर्षी लवकर या!!
- अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback