Poem : बांध अनिरुद्धा पाय माझे आता नको येरझाऱ्या .. (by Dr. Nishikantsinh Vibhute)





बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या ..
बहू भटकंती झाली अनिरुद्धा
नको मोक्षाचे द्वार
काय करायची स्वतंत्रता
बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या
काय करू स्वातंत्र्याचे तुजवाचून
न कुठे जायचे माहीत
न काय मिळवायचे माहीत
बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या
संसारामध्ये भरकटले मन दाही दिशा
थकलो रे आता दाखव रे अकरावी
बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या
अहंकाराने डोके सतत वर काढले
आता बुद्धीचा कडेलोट करुनी तू टांग रे उलटे मजला
बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या
असे बांध आता की न सुटेल ती मजला
तुझ्या हातीच ठेव दोर कायमची माझी काळजी रे तुजला
बांध अनिरुद्धा पाय माझे
आता नको येरझाऱ्या
हरी ओम् श्री राम अम्बज्ञ

-डॉ निशिकांतसिंह विभुते


Comments