Poem : फक्त तो एकच (by Ankitaveera Patil)



फक्त तो एकच

आयुष्याचा वाटेवर चालताना सुखदुःखांची श्रुंखला लागते..
तुझे प्रेमच ह्या श्रुंखलेपेक्षा मोठं आहे हेच मुळात विसरुन जाते..

राग गर्व ह्या असुरी वर्तनात आपण नेहमीच बुडलेलो असतो..
आपण कसेही वागलो तरी जो आपल्यावर रागवत नाही अशा आपल्या डँड लाच आपण विसरून जातो..

किती चिंता किती विचार किती ती धावाधाव यशासाठी..
आपण विसरलोच रे डँड चे प्लँनींग आपल्यासाठी..

प्रेमाचा भुकेला तो आला आहे प्रेम लुटण्या..
अनुभवांना चमत्कार बोलणारयांचे तोंड कायमचे बंद करण्या..

एक विश्वास पुरता नेइल आपल्याला यशाचा शिखरी..
हरीगुरु गुणसंकिर्तनातून भक्तिचा झेंडा फडकवू ह्या अवघ्या विश्वावरी..

--- अंकितावीरा पाटील

Comments