जाण्यास मिळाले कोल्हापूरला , पुरली मनाची आस
दाऊ नंदाईचे प्रेम अनुभवले भाग्य आमुचे खास ।।१।।
दाऊ नंदाईच्या प्रेरणेने सर्व सेवक गावकर्यांच्या भेटीस निघाले ,
गावकर्यांच्या निस्वार्थ , निरागस भावाला प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले ।।२।।
गावकर्यांसोबत भजन ,गजर रंगले अनिरुद्धाचे
नंदाईच्या सेवकांनी केले वाटप उपयोगी सामानांचे ।।३।।
एक वर्षाची परीक्षा संपली ,मायेची उब गोधडी रूपाने मिळाली
चिमुकल्या हातांना खेळणी मिळताच चेहऱ्यावरील हास्याची कळी खुलली ।।४।।
बोलता बोलता पहिला दिवस संपला
दिवसाखेरीस सर्व श्रद्धावानांनी नंदाईचा सत्संग अनुभवला ।।५।।
दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली दाऊ नांदाईच्या स्मित हास्याने
प्रत्येक गावकर्याचा एकच हेतू , साक्षात अन्नपूर्णेचे प्रेम अनुभवने ।।६।।
गावकर्यांची लगबग झाली सर्व चिमुकले मैदानात जमा झाली
आई ,दादांच्या संगे आरोग्य तपासणीच्या शिबिराला सुरुवात झाली ।।७।।
आरोग्यविषयक सल्ला लाभला ,अन्नपूर्णेचा प्रसाद मिळाला
शिबिराला येणारा प्रत्येक समाधानी श्रद्धावानाला आई दादांचा प्रेमळ आशीर्वाद मिळाला ।।८।।
वाटेकडे डोळे लावून वाट पहात होती आजी
कधी येऊन प्रेमाचा वर्षाव करणार नंदाई माझी
माय येताच मनी हर्ष झाला ,तिचे प्रेम अनुभवण्याचा योग पुन्हा एकदा लाभला ।।९।।
सेवा करता करता वेळ झाली निरोप घेण्याची
मनी आस लागली पुन्हा एकदा तिचे प्रेम अनुभवण्याची ।।१०।।
-- प्रणोतीवीरा निर्हाळी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback