Poem : आणिले दोर बांधून (by Aniketsinh Gupte)


Listen AUDIO Version

प्रश्नात माझ्या बुडालो मी
प्रश्नात माझ्या गुर्फटलो मी
उत्तरांच्या शोधात
नविनच प्रश्नात गुंतलो मी

ह्याच दगदागित हसणे विसरलो मी
आपल्या सोबती बरोबर हितगुज सोडले मी
संसाराच्या रगाड्यात
क्षणभर विश्रांतीही विसरलो मी

थकलो आता शक्तिहीन जाहलो मी
मी व माझं ह्यातची अडकलो मी
धूसर झाल्या आठवणी
आश्रुंच्या पाटात बेरंग झाली जिंदगी

कासाविस झाला जिव हताश जाहलो मी
धडपडतो आहे शोधत नवा मार्ग मी
फसले सारे डाव
वाटले पुरता अडकलो मी

त्या गडद अंधारात एक प्रकाशवाट दिसली
मनातील सारी अशांतता जणू कुणी खेचून न्यावी
तो खेळ होता दैवी
आणिले दोर बांधून त्याच्या पायाशी

दुःखाचे ढग विरून गेले, स्वच्छ हे आभाळी
कोरड्या जमिनीवरी फिरली नांगर सत्याची
प्रेमाचा झाला वर्षाव
फुटले अंकुर, झाडे ही फुलली आनंदाची

त्याची लीला फ़क्त तोच जाणी
बाळांसाठी निव्वळ ममता पाझरी
माय चंडिकेचा पुत्र असा हा
माझा बापू हा सर्वात लई भारी

नव्या उमेदाने जगतो आता मी
भटक्या मनाला वेसण घालतो मी
शक्तीचे हे नवे स्तोत्र
भक्तिशिवाय पर्याय नाही हेचि जाणिले मी

~ अनिकेत गुप्ते
(Aniruddha Kaladalan)
----------------------

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback