Poem : कलेच्या ध्यासाने (by Anupriyaveera Sawant)



कलेच्या ध्यासाने
मनाची कक्षा रुंदावली
अनिरुद्धच्या भक्तीने
कलादालनने खुलवली

कलेतून साकारली
अनिरुद्धाची भक्ती
देवयानपंथाची कृपा
नव्याने गवसली

नकळत स्पर्श
अमृतरुपी प्रेमाचा लाभला
त्यातूनच  नाळ
चंडिकाकुलाशी जुळली

अनन्य प्रेम स्वरूप
अनिरुध्द आमचा
माय चण्डिकेच्या
करुणेने श्रद्धावानांचा

प्रेमस्वरूप पावित्र्य
बापू नंदाई आमचे
मार्गदर्शन असे
नित्य सूचित दाउंचे

निरंतर तुझ्या चरणी
अंबज्ञ राहुनी आम्ही
जय जगदंब जय दुर्गे
त्रिविक्रमाचा जयजयकार करुनी.

अंबज्ञ.
अनुप्रियवीरा आदित्यसिंह सावंत.



Comments