Poem : बापू म्हणजे प्रेम (by Anupriyaveera Sawant)



बापू म्हणजे प्रेम.
आपला खरा आप्त असल्याचा
खराखुरा साक्षीदार.

बापू म्हणजे आप्त.
जीवन जगायला शिकवणारा,
जगताना सजवायला शिकवणारा,
सजवताना प्रेम करायला शिकवणारा.

प्रेम करताना पवित्र्यात राहून
प्रेमाची मुळ घट्ट जमिनीत रोवून,
प्रेम निभवायला शिकवणारा
नंदाईचा अनिरुद्ध.

बापू म्हणजे प्रकाश.
आयुष्याच्या दिशेला
उचित मार्ग दाखवून
देवयान पंथावरून चालवताना
प्रकाशित करणारा सूर्यप्रकाश.

बापू म्हणजे एक नजर.
जी नजरेतूनच नजरेशी बोलणारी,
नयनांना सुखावणारी,
मनाला शांत करणारी,
आत्म्याला तृप्त करणारी,
परमात्मा दर्शनाची झलक दाखवणारी.

बापू म्हणजे वाऱ्याची झुळूक.
वेदनांना हळूच फुंकर घालून
जीवाला आनंद देऊन
सुखावणारा गारवा.

बापू म्हणजे पाऊस.
प्रेमा मध्ये न्हाऊ घालणारा,
अनिरुद्ध प्रेमसागर.

बापू म्हणजे सुगंध.
प्रत्येक श्वासात दरवळणारा.

बापू म्हणजे गोड हास्य.
जिथे आयुष्याचा सार्थक होतं
आणि अनुभवताही येत असं सुखं.

बापू म्हणजे जीवनाचे बंध.
प्रीतीचे असे जन्मांतरीचे गोड नातं.

बापू म्हणजे मैत्री.
नक्षत्रासारखी चमकणारी,
नेहमीच सोबतीला राहून
जीवन फुलवणारी.

बापू म्हणजे सामर्थ्य.
मनाला अफाट बलं बुद्धी देणारा
मनःसामर्थ्यदाता.

बापू म्हणजे जीवन.
जे सौंदर्यापेक्षाही सुंदर,
स्वप्नांपेक्षाही रम्य,
आणि ह्याही पेक्षा सर्वात सुंदर
बापू माझ्या जीवनात तुझं असणं.

बापू म्हणजे विश्व.
अवघ्या विश्वाचा ब्रह्मांड नायक.

बापू म्हणजे अद्भुत सत्य
तू आणि मी मिळून शक्य नाही,
असं ह्या जगात काहीच  नाही.
ह्याची १०८ टक्के ग्वाही देणारा
चंडीकेचा पुत्र अनिरुद्ध.

हरी ओम
श्रीराम
अंबज्ञ
अनुप्रियावीरा आदित्यसिंह सावंत.

Comments

  1. श्रीराम अंबद्न्य अनुप्रिया वीरा
    indeed बापू म्हणजे अदभुत सत्य
    अम्बद्न्य

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback