Poem : होळी उत्सव (by Pranilsinh Takale)



श्रद्धावान होती धन्य सारी...
फाल्गुन पौर्णिमेची झाली पहाट,
  माझ्या अनिरुद्धाची बघण्या वाट,
साईनिवास सज्ज झाले आज,
  दर्शनाची ऊराशी बांधूनी गाठ...१

वर्षानुवर्षाची सुंदर परंपरा
 आजही अव्याहतपणे ती सुरु,
मी येईन हे साईंचे सत्यवचन,
  जीवनी आपल्या घट्ट धरु...२

तसबीर रुपी साईंचे आगमन,
  ह्याच दिवशी झाले घरी,
अनिरुद्घ रुपी येऊनी ही,
 पाळतो वचन तो परोपरी...३

जुन्या वाईट प्रारब्धांची होळी,
  करेल दृष्टांची समूळ राखरांगोळी,
अनिरुद्ध माझा सक्षम ह्यासाठी,
  भरवण्या मला सुखाची पुरणपोळी...४

तुझ्या रंगात रंगण्याची तयारी,
  अनुभवतो मी ती लीला न्यारी,
होळी उत्सवाला येऊन दर्शनाला,
   श्रद्धावान होती धन्य सारी...५

- प्रणिलसिंह टाकळे

Comments