D२१ फेबुवारी ची पहाट झाली
सूर्याची किरणे डोक्यावर आली ।।१।।आई दादांचे आगमन झाले
पेंढाखळे नगरीला नवंचैत्यन आले ।।२।।
नंदाईला दादांना सर्वांनी डोळे भरून पहिले
बापू माऊलीला मात्र सगळे आठवत राहिले ।।३।।
देई शिकवण निस्वार्थ प्रेमाची
काय सांगू थोरवी मी चण्डिकाकुलाची ।।४।।
प्रत्येकाला मनी हर्ष झाला
दाऊ नंदाई आलेत शिबिराला ।।५।।
मायेच्या ऊबेची गोष्टचं न्यारी
जुन्याच सोन करायची झाली तयारी ।।६।।
आता शिबिराचा दुसरा दिवस उजाडला
साक्षात अन्नपूर्णेचा सहवास लाभला ।।७।।
शाळकरी मुलांच्या दिंड्या निघाल्या
भजनात जो तो आनंदे डोलू लागला ।।८।।
अन्नपूर्णा प्रसादमचा घेतला आस्वाद
श्रद्धावांनाशी साधला संवाद ।।९।।
आरोग्य शिबिरात स्वतःला करून घेतले चेक
निघाली मंडळी घरी जायला थेट।।१०।।
येणारा प्रत्येक जण काहीतरी शिकवून जात होता
कसं जगायचं कस वागायचं सांगून जात होता ।।११।।
असा हा कोल्हापूर आरोग्य शिबिराचा अनुभव
खूप अनोखा आणि सुदंर होता ।।१२।।
अंबज्ञ
- शरयूवीरा दिवेकर
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback