जन्मजन्मांतरीचा तू सखा त्याचा,
साथी त्या परमात्म्याला दर युगाचा...
साथी त्या परमात्म्याला दर युगाचा...
प्रभूरामचंद्राचा तू लक्ष्मण होसी,
श्रीमुरलीधराचा बलराम,
कधी लहान तर कधी मोठा...
मुखी तुझ्या "त्याचे"च नाम...
श्रीमुरलीधराचा बलराम,
कधी लहान तर कधी मोठा...
मुखी तुझ्या "त्याचे"च नाम...
पडद्यामागूनी त्याला सहाय्य तुझे,
त्याच्याभोवती सदैव वसे,
बापूंच्याबरोबर सतत आम्हांसाठी,
झटताना तुझे सर्व कष्ट दिसे...
त्याच्याभोवती सदैव वसे,
बापूंच्याबरोबर सतत आम्हांसाठी,
झटताना तुझे सर्व कष्ट दिसे...
अवघडलेल्यांना दावण्या मार्ग तू,
श्रद्धावानांचा तू समर्थ मार्गदर्शक,
तुझ्या नव्या योजनेमध्ये मागे,
आम्हाला गवसते यशाचे गमक...
श्रद्धावानांचा तू समर्थ मार्गदर्शक,
तुझ्या नव्या योजनेमध्ये मागे,
आम्हाला गवसते यशाचे गमक...
मर्यादापालनाचा धडा गिरवतो तू,
अन् आम्हांलाही शिकवतोस तू,
त्यागाचे ते मूर्तिमंत रुप तुझे,
आम्हांसाठी पण त्याग करतोस तू...
अन् आम्हांलाही शिकवतोस तू,
त्यागाचे ते मूर्तिमंत रुप तुझे,
आम्हांसाठी पण त्याग करतोस तू...
जन्मोजन्मी चालत राहिन मी,
देवयानपथ दाऊ तुमच्या मदतीने,
वाढदिवसाचे तुमच्या करितो औक्षण,
आई चण्डिकेच्या प्रेमळ स्मरणाने...
देवयानपथ दाऊ तुमच्या मदतीने,
वाढदिवसाचे तुमच्या करितो औक्षण,
आई चण्डिकेच्या प्रेमळ स्मरणाने...
प्रणिलसिंह टाकळे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback