Poem : कळत नाही या मनाला.... (by Swapnaliveera Agre)



कळत नाही या मनाला....बापू
असा कसा रे तू......
न बोलताच या मनीचे भाव जाणून घेतोस,
पण तरी का कळत नाही या मनाला.......
दुःखाचे डोंगर तुझ्या पुढे
येऊन आदळत बसतो
सुख मात्र स्वतःपाशीच राखून ठेवतो,
पण तरी का कळत नाही या मनाला......
श्रद्धा,सबुरी,विश्वास याची 
शिदोरी दिलीस बांधून आम्हाला,
पण तरी का कळत नाही या मनाला......
लेकरांसाठी सतत झटत राहतोस
स्वतःचा विचार मात्र तू करायलाच विसारतोस,
पण तरी का कळत नाही या मनाला......
येता जात तू नेहमीच सोबत असतोस
काही अघटित घडताच मनाची पाल मात्र चूकचुकवतोच,
पण तरी का कळत नाही या मनाला......
कुठलीही अपेक्षा न ठेवता
भरभरून प्रेम करतोस आमच्यावर,
पण तरी का कळत नाही या मनाला......
बापू तुझ्या प्रेमाची तहान
आता तरी समजेल का रे मला.....
मला हवा आहेस तू कायम माझ्या जवळ,
                           कायम माझ्या जवळ, 
पण तरी का कळत नाही या मनाला?......


                       स्वप्नालीवीरा आग्रे.
                        (दिंडोशी केंद्र).


Comments