Poem : महिषासूर वध: निश्चित: (by Nandansinh Bhalwankar)


महिषासूर वध: निश्चित:

नाव कन्हैय्या, वर्तन मात्र राक्षसी कंसाचे
करून अपमान दुर्गेचा, धाडले आमंत्रण स्वयं स्वविनाशाचे

खवळले भारतीय सारे, ठेवून एकच आस
भारतमातेबद्दल वाईट बोलणार्‍यांच्या आवळो गळा फास

निषेध त्या जे.एन.यूचा, तिथे सारे बेशरम
भारतभुमीचे हे कलंक, करू त्यांना नामोहरम

भक्षिले गोमांस, केली सैनिकांची विटंबना
अशा निर्लज्ज अधमांना होवो शासन, हीच आमुची भावना

अरे आले असे किती दैत्य महिषासूर, सारे गेले वधिले
या विश्वाच्या जननी दुर्गेला, आम्ही सार्‍यांनी वंदिले

दुर्गा स्वयं महाकाली, रक्तदंतिका महिषासूरमर्दिनी
बघ आता महिषासूरा, तुझा अंत तुझ्याच डोळ्यांनी 

 - नंदन भालवणकर, दादर

------------------------

Comments