Poem : श्रीशब्दध्यानयोग ( by Chitraveera Tembe)




श्रीशब्दध्यानयोग 

काय आहे हा श्री शब्दध्यानयोग?

दिसतात मला रंगच रंग आल्हाद उत्साह, प्रसन्नता देणारे,
इंद्रधनुचे रंग जणू सभोवार उधळलेले.

ॐ लं, ॐ वं, ॐ रं,
ह्यांचा आहे रंग
पिवळ्या कोवळ्या सुर्यफुलांचा, पिवळ्या चाफ्यासारखा,
हरिद्रेसारखा,
मावळणार्‍या सूर्यास्ताच्या लाल, केशरी, तांबड्या,
शांत आसमन्तासारखा,

ॐ यं,
ल्यालेला आहे,
     हिरव्या रंगाच्या छटा
मोराच्या हिरव्या पिसार्‍यासारखा,
     आई मीनाक्षी सारखा,
नववधूच्या हिरव्या रेशमी शाळूसारखा,
     लांबवर पसरलेल्या शेतांसारखा,
हिरवळीचा शेला पांघरलेल्या वसुन्धरेसारखा,
     घनदाट अरण्यासारखा,
पावसाच्या पाण्याने, न्हालेल्या ओथंबणार्‍या चिंब पानांसारखा.

ॐ हं, ॐ उं
वाटतो, विशाल, विराट अंतरीक्षासारखा
     आभाळासारखा,
शीतलता देणार्‍या निळ्या, जांभळ्या निशेसारखा,
     पौर्णिमेच्या चन्द्रप्रकाशाने,
उजळून टाकणार्‍या घननीळ नभासारखा,
     त्याचेच प्रतिबिंब घेऊन उसळणार्‍या सागराच्या लाटांसारखा,
निळ्या मखमली वस्त्र पांघरलेल्या पहाटेसारखा.


ॐ ने व्यापलेले आहे ब्रह्मांड सारे,
हा श्री शब्दध्यानयोग आहे पक्ष्यांच्या मंतरलेल्या स्वरांसारखा,
फुलपाखरांच्या नाजूक रंगीत पंखांसारखा,

हा श्री शब्दध्यानयोग आहे नंदाईच्या मधाळ सुगंधित शब्दांसारखा,
दादांच्या तेजासारखा,
श्री विष्णूच्या सुदर्शन चक्रासारखा.
ह्या महिषासुरमर्दिनीच्या दिव्यत्वाच्या अनुभूतीसारखा

ह्यात आहे आनंद सुखद पावसाच्या सरींचा,
स्वच्छ पहाटेच्या प्रहरी निसर्गावर पडणार्‍या दवबिंदुंचा,
पुष्प अलगद उमलण्याचा,
विस्मित होऊन त्यांचे सौंदर्य न्याहाळण्याचा,

श्री शब्दध्यानयोग आहे आर्तता सप्तस्वरांची,
सप्तरंगांची, सप्तप्रदेशांची,
एका भक्ताच्या आर्त हाकेची

ह्यात आहे स्पर्श चंडिकाकुलाचा,
त्यांच्या कारुण्याचा आणि वात्सल्याचा
ह्यात स्पर्श आहे मायेने हात फिरवणार्‍या आईचा

हि तर निव्वळ तोंडओळख वाटते
श्री अनिरुद्धांच्या किमयेची, त्यांच्या मिश्किल भुलवणार्‍या हास्याची,
प्रेमाची, मायेची आणि अकारण कारुण्याची.

हा श्रीशब्दाध्यान्योग आहे आश्वस्त करणार्‍या सुखद, असीम आनंदाने भारलेल्या
‘माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते’ ह्या शब्दांचा.

हा प्रवास आहे त्याच्याकडून त्याच्याकडेच त्यानेच दिलेले रंग नीट ओळखण्याचा
आल्हाद अनुभवण्याचा.

श्री अनिरुद्धांचेच अनिरुद्धांनी दिलेले आईचे प्रेममय प्रफुल्लीत विश्व अनुभवण्याचा.

आपल्या शून्यसाक्षिणीच्या शब्दांच्या पलीकडे असणार्‍या निरामय सौंदर्याला अनुभवण्याचा.

नीज सुख निलय ओळखण्याचा.


- चित्रावीरा. अ . टेंबे 

Comments