का कोण जाणे बापू
POEM BY :- SUYASHSINH GAWAD
का कोण जाणे बापू.....
का कोण जाणे बापू आज एकटे एकटे वाटे
आयुष्याच्या प्रवासात अशी ही एक वेळ येते
सर्व जवळचे असून सर्व दूरचे वाटते
पण बापू तू नेहमी जवळचा वाटतो
तुला बघितले बापू की जगण्याचा हुरूप येतो
तुज्याशी बोले बापू की मन मोकळे होते
आणि जीवन खुप सुंदर आहे ह्यावर विश्वास बसतो
आयुष्याच्या सुंदर वळणावर बापू तू भेटलास
आणि आमचे आयुष्य अंबज्ञ झाले
बापू तू आणि फ़क्त तूच मला सांभाळू शकतोस
कारण माझ्या प्रत्येक पावलागणिक बापू
तू माझा हात घट्ट् पकडला आहेस
कधी ही न सोडण्यासाठी.....
कधी ही न सोडण्यासाठी.....
कधी ही न सोडण्यासाठी.....
हे बापूराया तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
- सुयशसिंह गावड
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback