Poem : असा हा त्रिविक्रम आहे प्रेमळ बाप.......( by Kirtee Rode)


तिन्ही काळाच्या वर असणारा
सर्व वेदांच्याही पलीकडे असणारा
तिन्ही लोकांवर असे याची सत्ता
अशुभ तत्वाचा नाश हाच ज्याचा मक्ता
पुत्र हा माय चण्डिकेचा
राजा अखिल ब्रम्हाण्डचा
देवी वाहन बनूनी
करे शत्रुचा नाश
याच्या सिंहगर्जनेपुढे
न टिके शत्रुंचे पाश
असा हा त्रिविक्रम आहे प्रेमळ बाप श्रद्धावानांसाठी
असे तत्पर सदैव आपल्या लेकरांसाठी
अहोरात्र हा करितसे
परिश्रम लेकरांसाठी
तपश्चर्या व्रत वैकल्ये बाळांच्या हितासाठी
सर्वस्व वाहून देणारा असा हा माझा बाप
सर्वस्व माझे राहो सदा
हीच माझी आस
Poem by
किर्ती रोडे
बदलापूर (पूर्व)

Comments