तू मायेची सावली, तू लेकरांची माऊली ।।
दिसता तुझे मुख, मिळे काळजासी सुख ।।
सुरक्षित वाटे मज आईच्या गर्भापरी, गुरुक्षेत्रमीच्या गाभारी ।।
सागरासामान वात्सल्य तुझे, आभाळापरी माया ।।
तुझिया चरणी विराजे, माझा अनिरुद्धराया ।।
अपराधासी माफ करी, क्षमा तुझे नाव ।।
तुला न कळे दुजा भाव, कवटाळी लेकरा उराशी ।।
अशक्य असे काही नाही, देवीसिंह आणि मोठी आई असता पाठीशी ।।
- अम्बज्ञ शरयुवीरा दिवेकर
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback