नंदाई -अनिरुद्ध
शोभती लक्ष्मी-नारायण नंदाई-अनिरुद्ध
फिटते पारणे डोळ्यांचे बघुनी तयांस
लक्ष्मी करण्या प्रसन्न, वदा नाम नारायण
गालात हसे नंदामाय, जपता मुखी अनिरुद्ध
फुगडी खेळण्या नंदाई संगे रंगतो अनिरुद्ध
जणू कृष्ण झाला तल्लीन राधेच्या रासात
बापूच्या तालात नंदाई दंगते
राधा जणू कृष्णाच्या रंगात रंगते
नंदाई-अनिरुद्ध जणू शिव-शक्तीचा मिलाप
अवतरले वसुन्धरेवरी गुरुक्षेत्रामात
सौंदर्य सम्राज्ञी उमा-नंदा, तिचा अनिरुद्ध भोळा
झटती निरंतर मानव हित साधण्या
युगायुगांची साथ तयांची, प्रकटले भूमंडळी
धन्य होती श्रद्धावान ठेवुनी माथा त्याचरणी
अनिरुद्धार्पणमस्तु
अंबज्ञ
शैलजावीरा बामणे
दुबई.
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback