Poem : श्री त्रिपुरारी त्रिविक्रम ( By Kirteeveera Rode)

प्रज्ञापराधांनी गांजलेल्या मज
आलास शुद्ध करण्या तू

ओजहीन अहंकारी
मन प्राण प्रज्ञेस
सदगुरुतत्व बनूनी
आलास उद्धरण्या तू

प्रजापति ब्रम्हा महाविष्णु अन् परमशिवाचे एकत्रित रूप हे तुझे
आमचा समग्र विकास घडविण्या भूलोकी या अवतरले

मनाचे माझ्या चित्त करण्या
प्राणांना या शुद्ध करण्या
परिपूर्ण करण्या मम प्रज्ञेस
त्रिविक्रम बनूनी आलास तू

कलि स्वरूप बनलेल्या    
मम मन प्राण प्रज्ञेस आलास शुद्ध करण्या तू

अनिरुद्ध गति तव अनिवार प्रेम
अवतरलास घडविण्या आमचा योगक्षेम

खराखुरा सदगुरु मित्र तुझ्यासारखा
मिळो जन्मोजन्मी पिता
तुझ्या सारखा

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments