Poem : आपले नाते बापू असावे.... (by Suyassinh Gavad)


आपले नाते बापू असावे.... 

नाते असावे हिमालायासारखे,सगळ्या परिस्थितीमधे तग धरून राहणारे
तसे आपले नाते बापू असावे सर्व संकटामधे तग धरून राहणारे ।।१।।
नाते असावे नदीच्या पात्रासारखे,पाणी आणि पात्र वेगळे असले तरी सदैव साथ देणारे
तसे आपले नाते बापू असावे सदैव साथ देणारे  ।।२।।
नाते असावे विशाल सागरासारखे,अथांग रूप असलेले
तसे आपले नाते बापू असावे अथांग रूप असलेले ।।३।।
नाते असावे सुर्यासारखे, सदैव तेजस्वी आणि प्रकाशमय
तसे आपले नाते बापू असावे तेजस्वी आणि प्रकाशमय ।।४।।
नाते असावे चंद्रासारखे,सदैव प्रेमळ आणि शीतल असणारे
तसे आपले नाते बापू असावे प्रेमळ आणि शीतल असणारे ।।५।।
नाते असावे आभाळासारखे,सगळे काही सामावून घेणारे
तसे आपले नाते बापू असावे सगळे सामावून घेणारे ।।६।।
नाते असावे ध्रुव तारयासारखे,अढळपद प्राप्त करणारे
तसे आपले नाते बापू असावे अढळपद प्राप्त करणारे ।।७।।
बापू आपले नाते असावे सदैव बाप मुलाचे
तू माझा प्रेमळ बाप आणि मी तुझा खटाळ मुलगा ।।८।।

।।हे बापुराया तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे।।

- सुयशसिंह गावड


Comments