Poem : सुंदर कहाणी... (by Ajitsinh Padhye)



एक होता राजा आणि एक होती राणी...
पराक्रमी शूर राजा, प्रेमळ गुणवंत राणी
सुखी समृद्ध राज्य, अवघ्या सुखांची खाणी
आता ऐकूया त्यांची तेवढीच सुंदर कहाणी...

बालपणी अशी गोष्ट नेहमी ऐकण्यात यायची
आजी आजोबांच्या खास शैलीतील असायची
अशा राजा राणींबद्दल नेहमी ओढ वाटायची
प्रत्यक्षात भेटतील का?-इच्छा दाटून यायची

.....आणि काय सांगू मोठ्या आईची करणी
गोष्टीतील राजा-राणी प्रत्यक्षात आले धरणी
ह्याची देही ह्याची डोळा अनुभवतोय तीच कहाणी
सुखी समृद्ध राज्य, अवघ्या सुखांची खाणी

बापू-नंदाईचा संसार ज्या क्षणी साकार झाला
वृंदावनच जणु अवतरले, संसार ङ्गुलत गेला
आदर्श पती-पत्नीचे नाते जाणवते प्रत्येक क्षणाला
नजर ना लागो त्यांच्यातील हळुवार प्रेमाला

पायरी उतरताना जेव्हा बापू आईला आधार देतात
नंदाईच्या हाताला ज्या नाजुकतेने हातात घेतात
जणु अत्यंत नाजुक ङ्गुलाला ते ओंजळीत धरतात
पुरुषार्थाने भारलेल्या प्रेमाची कोमलता दर्शवितात

किती भाग्यवान आम्ही अंतपार नाही त्याला
बापू-नंदाई लाभले बाबा-आई नात्याने आम्हाला
संसार कसा करावा, पुस्तकी ज्ञान हवे कशाला?
चालते-बोलते पुस्तक दिले मोठ्या आईने आम्हाला

बाप कसा, तर बापूसम लढायला शिकवणारा
प्रारब्धावर मात करून आनंद खेचूनही आणणारा
आई कशी, तर नंदाईसम आत्मबल वाढविणारी
वादळातही तिचा पदर आम्हावर धरून ठेवणारी

बाप कसा, तर बापूसम पोरांना कणखर बनविणारा
लाड करतानाही, ङ्गाजील लाड सहन न करणारा
आई कशी, तर नंदाईसम वेळेचे नियोजन शिकविणारी
बापाचा धाक घालून पोरांना वटणीवर आणणारी

थोडक्यात तेच ते शूर राजा, प्रेमळ गुंणवंत राणी
रामराज्याची स्थापना, नको आम्हाला काही आणि
बापू-आईच्या लग्नाच्या वाढदिवसाची आज पर्वणी
शुभेच्छा व्यक्त करते अंबज्ञतेने भरलेली ही वाणी

बापू-आई ! लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !!!

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

- अजितसिंह पाध्ये



Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback