Poem : सुंदरकाण्ड पठण (by Kirteeveera Rode)

रामाचा हा दूत व बंधू
महाप्राणाला या आपण वंदू 

सुग्रीवाचा रक्षक सखा मार्गदर्शक बिभीषणाचा
सीता माईचा तात असे हा
अवतार दत्तात्रेयांचा

सूर्यासही गिळंकृत करण्याचे सामर्थ्य असे जयाचे
स्मरण करुया मिळुनी आपण अशा या अंजनीसुताचे

आदिमातेचा हूंकार असे ज्याचे अस्तित्व
अशा महाप्राणाकडे सोपवू आपल्या जीवनाचे नेतृत्व 

होईल सुन्दरकाण्डा प्रमाणे  सुन्दर  जीवन आपुले   राहो सदा राम-हनुमंताप्रमाणे
नाते बापू व आपुले

Poem by:
- किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments