Poem : घननिळा (by Shailajaveera Bamane)




घननिळा ----

जीवनी पेटला होता वैशाख वणवा
कासावीस जीव झाला होता ||
जागली आंस अंतरी घननिळाची
झाकोळून आलं नभ त्याक्षणी ||
घन नीळ नभी दाटून आला
नाचू लागला 'मयुर 'मनीचा ||
रूप पाहता मनोहारी
नाद अंतरीचा उमटू लागला ||
आभाळमाया पसरू लागला
प्रेम वर्षाव सुरु झाला ||
घन नीळ बरसला जीवनी
प्रेमे नाहतो नित्य आम्ही ||
कृपा वर्षाव करता भक्तीबीजा
पीक डोलले मनाच्या उजाड राना ||
बरस बरस बरसू लागला
आनंदघना --नंदारमण ||
चिंब भिजवुनी ,प्रेमे जिंकले
ह्या श्यामसुंदर आनंदघनाने ||
पिसारा खुलवुनि मनमयूर नाचू लागला
बेभान झाला ,मनमुराद आनंद लुटू लागला ||
रहा सदा बरसत असा
नंदाकांत --सच्चिदानंदघना ||
अनिरुद्धर्पन्मस्तु
अम्बज्ञ
शैलजावीरा बामणे ,दुबई .


Comments