असा कसा बापू तू आमच्यावर एवढे लाभेवीण प्रेम करू शकतोस
असा कसा बापू तू संकटात हाक न मारताच धावत येऊ शकतोस
असा कसा बापू तू आमच्या चुकाना पोटात सामावून घेऊ शकतोस
असा कसा बापू तू आम्हाला सहज क्षमा करू शकतोस
असा कसा बापू तू आमच्यासाठी रात्रं-दिवस झटू शकतोस
असा कसा बापू तू खंबीरपणे आमच्यापाठीशी उभा राहू शकतोस
असा कसा बापू तू आम्हाला चण्डिकेची सहज कृपा प्राप्त करून देऊ शकतोस
असा कसा बापू तू आमचे जीवन अंबज्ञ करू शकतोस
।।हे बापुराया तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे।।
सुयशसिंह गावड
Ambadnya
ReplyDelete