माझा बापू



शुद्ध ब्रह्म चैतन्याचे ते एक नाव,

भक्ती च्या प्रवासातले ते एक गाव ।।
सत्य,प्रेम,आनंद हेच त्यांचे तत्व,
गंगे हुनी निर्मळ आहे त्यांचे स्वत्व ।।
नंदाई,सूचित दादां संगे रमे त्यांचे मन,
मोठया आई च्या चरणी त्यांचे जीवन अर्पण ।।
आपले मन आपलेच दर्पण,
घ्या हो ठसवुनी तुम्ही बापूंची शिकवण ।।
लेकरां साठी धाव धावती ती एक मूर्ती,
बापू माझा आहे, कल्याणस्फुर्ती..  ।।

- Sonaliveera Bellubi

Comments