Poem : आधारवड (by Pranilsinh Takale)


आधारवड....
तुझ्या प्रशस्त छायेखाली सुखावलो,
    तुझ्या कारुण्याच्या पारंब्याला लटकलो,
तुझ्या कृपेच्या आशीर्वादाने मी आज,
   तुझ्या अंगाखांद्यावर बागडलो....१

आजवरी मी कित्येकदा चुकलो,
  तुझ्या शब्दांच्या आस्वादाला मुकलो,
चुकांचे गाठोडे माझे तुझ्या मुळांशी ठेव,
  तुझ्याशी मी आता एकरुप झालो...२

संकटात तू माझा होसी कैवारी,
   घडू दे मला तुझ्या प्रेमाची वारी,
एकच असे वरदान दे मजला,
  तुझा विसर न व्हावा एकही वारी...३

फळरुपी रसाळ आनंद अर्पतो,
   धाग्यारुपी अखंड नामस्मरणात गुंततो,
हळद-कुंकूरुपी सेवा भक्ती करतो,
   आज तुला मी माझ्यासाठी मागतो...४

आज मी तुलाच फे-या मारून,
   मागीन मी स्वच्छंदपणे मोठ्या आईकडे,
सात जन्म काय दर जन्मी आम्हांला,
   कायमचं सोपव ह्या आमच्या बापाकडे...५

- प्रणिलसिंह टाकळे

Comments