Poem : बोट धरुनी तुझ्या संग (by Kirteeveera Rode)


असंख्य वादळं असंख्य भोवरे
असंख्य दलदली अन् असंख्य खाच-खळगे
अशा निरर्थक जीवनास या  नव्हता कुठलाच अर्थ
बनूनी बाप बोट धरुनी माझे
दिलास मम जीवनास तू अर्थ

होती असंख्य वळणे निसरडया झालेल्या सगळ्या वाटा
पापे दलदली बुडवत होत्या असंख्य
अन् उसळत होत्या मनी भीतिच्या अगणित लाटा
आलास तव लेकिसाठी धावत तू अन् धरलेस माझे बोट
एकाच बोटाने वर ओढून मजला
केलेस शांत या संकटांचे लोट

वादळांना पाहून लेकीस तुझ्या वाटत होती भीति
तू धरलेस बोट माझे अन् पळून गेल्या साऱ्या भीती
रंग भरुनी मम जीवनी जगण्यास मजला शिकविले
अन् धरुनी बोट तुझ्या लेकिचे
आयुष्यच सुंदर केलेस

काय मागावे रे तुजला हेच मज ना सूचे
बोट धरुनी तुझ्या संग रहाणे
लेकीस तुझ्या या रुचे

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments