Poem : Happy Father's day (by Ketakiveera Kulkarni)



वाळीत टाकलेल्या मला
कवेत घेतलेस तूच देवा 

व्यर्थ गेलेल्या ह्या आयुष्याला
नवे वळण दिलेस तूच देवा 

कसलीही अपेक्षा न ठेवताही
भरभरून दिलेस तूच देवा 

फाटलेल्या माझ्या झोळीला
ठिगळही लावलीस तूच देवा 

इतके दिले आहेस तू मला
की ठेंगणं वाटू लागले आहे आभाळ आता 

परतफेड नाही करू शकणार मी कधी 
ठेव तुझ्या ऋणातच आता अडकवून मला 

फक्त तुझ्याच चरणात आहे सुख सर्व
ह्याची जाणीवहि मला तूच करून दिलीस देवा  

देव असूनही आता देव नाही
पण झाला आहेस तू सख्खा बाप माझा 

नको कधी दूर करूस तुझ्या ह्या लेकीला
तुझ्याच भक्ती सेवेत ठेव मला तू, हीच आजच्या दिवशी तुला प्रार्थना 

A VERY VERY HAPPY FATHER'S DAY TO MY ONE AND ONLY BESTEST DAD..

I LOVE YOU MY DAD FOREVER..

- केतकीवीरा कुलकर्णी 

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback