कधी येशील बापूराया, तुझ्या दर्शनाची आस मनीची पूरवाया. किती दिवस झाले तूला पाहिलेच नाही, मनात विचारांच काहूर उठलय, आसुसलेल्या नयनांना येरे दर्शन द्याया. तूझ्या भेटीसाठी मन सैरभैर झालेय, नजर भिरभिरतेय वाटेवर तूझ्या, धावून येरे लेकराची माय. माझ्या बाळानों शब्द ऐकाया कान आतूरलेत, आय लव यू डॅड बोलाया जीभ आतूर झालेय, कृपाकटाक्षे पाहवया येरे बापूराया. चातकाप्रमाणे तूझी वाट पाहणे झालेय, कूठवर करू प्रतिक्षा तूझ्या येण्याची, तूझ्या चरणांना मिठी माराया, आस मनीची पूरवाया. कधी येशील बापूराया, कधी येशील बापूराया. अंबज्ञ
- शालीनीविरा पोमेंडकर
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback