कर "त्याचीच" कामना
कर मना "त्याचीच" ध्यान धारणा,
कर "त्याचीच" कामना ।।
ध्याना साठी लागे हरी रूप हे साजिरे,
राम नामाच्या जपे अवघे विश्व हे फिरे,
विश्वमभरा साठी कर आता ही साधना,
कर "त्याचीच" कामना ।।१।।
देह रूपे जरी आला, विश्व व्यापुनी राहीला,
बापू नामाच्या जपाने पुन्हा अवतरीत झाला,
करुनी कुर्वंन्डी मनाची, कर "त्याचीच" उपासना,
कर "त्याचीच" कामना ।।२।।
घेऊनी वनवास फिरे रानोमाळ, अहिल्या, जटायू, शबरी साठी काटे तुडवी फुल म्हणून,
आता ओळख रे मना,
कर "त्याचीच" कामना ।।३।। कर मना "त्याचीच"ध्यान धारणा,
कर "त्याचीच" कामना ।।
- सौ. सोनालीविरा राहुल बेल्लूब्बी
चिंचवड
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback