Poem : लेकरं व्याकुळ तुझ्या दर्शना (by Jitendrasinh Shankhpal)

लेकरं व्याकुळ तुझ्या दर्शना,
किती समज देऊ या मना |

असंख्य लेकरं बघती तुझी वाट
बाप्पा येणार कधी , होणार कधी ती पहाट

बाप्पा घे तू कितीही परीक्षा
नको तुझ्या विरहाची शिक्षा

पंचपक्वान्न वाटे नकोशी
बाप्पा दर्शनाचे आम्ही उपाशी

विरह देऊनी काय मिळे उगाच
माहीत आहे त्रास होतोय तुलाच

का रे रागावलास अनिरुद्धहरी
तू तर दयाळू हिमालया परी

ये रे अनिरुद्धा मनमोहना
तुझ्याविना आता राहवेना

Poem by:
Jitendrasinh Shankhpal


-------------

Comments