बापुराया विनवतो तुजला...
बाळ मी तुझा आळवतो तुला
खूप कष्टतोस राया...काळजी बाळांची घ्यायां...
थोडी विश्रांती घे राया...थोडी विश्रांती घे...

विश्वाचा पालनकर्ता तू...
विश्वाचा चालक वाहक...
साऱ्या जगाचा पसारा चालवतोस तू...
दिवस रात्र एक केलेस...सुख बाळांना द्याया...
थोडी विश्रांती घे राया...थोडी विश्रांती घे...
विश्वाचा चालक वाहक...
साऱ्या जगाचा पसारा चालवतोस तू...
दिवस रात्र एक केलेस...सुख बाळांना द्याया...
थोडी विश्रांती घे राया...थोडी विश्रांती घे...
आई आणि मामा बापूना तुम्ही सांगा...
बाळांना जपताना काळजी स्वतःची घे...
दुखले खुपले मला तर स्वतःवर ओढवून घेतोस...
तुझे दुखणे घ्यायां मला नेहमीच नाही म्हणतोस..
तुला पाहायचे आता तुला न्याहाळायचे आहे...
थोडी विश्रांती घे राया...थोडी विश्रांती घे...
बाळांना जपताना काळजी स्वतःची घे...
दुखले खुपले मला तर स्वतःवर ओढवून घेतोस...
तुझे दुखणे घ्यायां मला नेहमीच नाही म्हणतोस..
तुला पाहायचे आता तुला न्याहाळायचे आहे...
थोडी विश्रांती घे राया...थोडी विश्रांती घे...
आळवतो दत्ता बाप्पाला आळवतो मोठ्या आईला...
आळवतो चंडिका कुळाला...आळवतो आई आणि मामाला...
दर्शन घडू दे तुझे बापू...विनवतो आता तुला...

- Rahulsinh Phalke
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback