केले अपराध अनंत
परि घेतलेस पदरात
काय तुझा हा भाव उदात्त
मज पामरासी केले भाव पाश मुक्त
नाही केले भजन पुजन
नाही केले जप ध्यान
तरी तू कायम भक्ता अधीन
आणि येतोस संकटात धावून
भक्त असता संकटात
जागसी तू रात्रंदिन
भक्त होता भवभयमुक्त
तदनंतर होत असशील तू निवांत
करिसी असंख्य लीला
खेळ खेळविसी वेळो वेळा
मझ्या मनाशी लागो तुझा सदैव लळा
हीच मागणी तुला कृपाळा
कुणासाठी रामकृष्ण रुप तू घेसी
कुणासाठी होई स्वामी साई
तर कुणाची सावळी विठाई
माझ्यासाठी तू अनिरुद्धाई
- विराजसिंह पाटणकर
Kolhapur
हरी ओम सद्गुरु वरील सर्वच कविता फारच छान, हृदय स्पर्शी आहेत. अंबज्ञ
ReplyDelete