Poem : मुखचंद्र दावी तू दर्शनाचा (by Santoshsinh Rane)



"मुखचंद्र दावी तू दर्शनाचा"

दिंडी माझ्या आयुष्याची
पाऊले मध्येच थांबती
अडखळला जरी जीवनप्रवास
परी "अनिरुद्ध विठ्ठल" सांगाती

तुझ्या समचरणांची
ओढ साऱ्यांसी लागली
आतुर सारे दर्शनासी
नयनी चंद्रभागा दाटली 

सुने-सुने मृदूंग झाले
टाळ वीणा थांबली
टाळ्यांच्या कडकडाटासही
तुझीच आस लागली

पाहतो तुज डोळे मिटूनी
चालतो प्रवासे विठूमाऊली
असशील कितीही व्यस्त तरीही
धरुनी उभा पाठीशी साऊली

आंम्ही भाग्यवान तुझी लेकरे
आधार तुझ्याच सुदर्शनाचा
वाट पाहतो गुरुपौर्णिमेसी
मुखचंद्र दावी तू दर्शनाचा

अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे

Comments