Poem : विश्वास आहे.... (by Aniketsinh Gupte)


कवितेच्या मुळ धाटनी पासून जरा वेगळी कविता....
***********************************
बापू....डोळे आसुसलेले आहेत तूला पाहण्यासाठी,
बापू....कान तरसले आहेत तुझा आवाज़ ऐकण्यासाठी,
बापू....मन अधीर झाले आहे तुझ्या दर्शनासाठी,
बापू....वाट पाहत आहोत तुझ्या एका 'हरी ॐ' साठी,
पण..........विश्वास आहे,
माझ्या दृष्टीला तुझ्याच नजरेचे सामर्थ्य आहे,
माझ्या प्रत्येक शब्दाला तुझ्याच आवाजाचे सामर्थ्य आहे,
माझ्या आनंदी क्षणांना तुझ्याच उपासनेचे सामर्थ्य आहे,
माझ्या भक्तिला तुझ्याच प्रेमाचे सामर्थ्य आहे,
माझ्या कार्याला तुझ्याच गतीचे सामर्थ्य आहे,
माझ्या यशाला तुझ्याच कृपेचे सामर्थ्य आहे,
म्हणूनच.....विश्वास आहे,
तुझा सहवास सतत माझ्याबरोबर आहे,
तुझा वरदहस्त सदैव पाठीशी आहे,
तरीही,
तू भेटावेस हीच प्रत्येक मनाची इच्छा आहे !
- अनिकेतसिंह गुप्ते
******************************************

Comments