Poem : जेव्हा सगळीकडे अंधार दिसेल तेव्हा.... (by Swativeera Awasarkar)


जेव्हा सगळीकडे अंधार दिसेल तेव्हा म्हणा अंबज्ञ,
 त्या अंधारातून मार्ग काढेल तो तुमच्या साठी
आणि मग अंधारातून बाहेर आल्यावर म्हणा अंबज्ञ ।।१।।

जेव्हा वाटेल सगळे मार्ग बंद झाले तेव्हा म्हणा अंबज्ञ,
तो तुमच्या साठी नवी दारे उघडेल
आणि मग त्या मार्गावरून चालतानाही म्हणा अंबज्ञ ।।२।।

जेव्हा मन दुखावेल, डोळे भरून येतील तेव्हा म्हणा अंबज्ञ,
तो तुमच्या दुःखावर अलगद फुंकर मारेल
आणि डोळे जेव्हा आनंदाने नाहून निघतील तेव्हाही म्हणा अंबज्ञ ।।३।।

जेव्हा आयुष्य एखादे कोडे वाटू लागेल तेव्हा म्हणा अंबज्ञ,
तो तुमचे कोडे नक्की सोडवेल
आणि जेव्हा आयुष्य सरळ मार्गाने चालू लागेल तेव्हाही म्हणा अंबज्ञ ।।४।।

जेव्हा वाटेल सगळे जग वैरी झाले आहे तेव्हा म्हणा अंबज्ञ,
मी तुला कधीच टाकणार नाही असे म्हणून तो तुम्हाला जवळ घेईल
आणि मग त्या बापुरायाच्या कुशीत शिरताना म्हणा अंबज्ञ ।।५।।

सुखात म्हणा, दुःखात म्हणा,
वेळ असेल तेव्हा म्हणा, नसेल तर वेळ काढून म्हणा,
आनंद झाल्यावर म्हणा, वाईट वाटले तरीही म्हणा,
सकाळी उठल्यावर म्हणा, राञी झोपताना म्हणा,
अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ अंबज्ञ, अंबज्ञ....

मी अंबज्ञ आहे, आम्ही अंबज्ञ आहोत,
हरी ओम, श्रीराम, अंबज्ञ

-Swativeera Awasarkar

Comments