Poem : माझा सावळा विठ्ठल (by Kirteeveera Rode)

माझा विठ्ठल तू
तूच माझा पांडुरंग
तुझ्या नाम गजरी
रंगले माझे अंतरंग
मनी तू ध्यानी तू
स्वप्नीही माझ्या तूच तू
कष्ट तू विश्राम तू
ध्यास तू अन् श्वास ही तू
रखुमाई संगे अवतरलास
या भूलोका पावन करण्या
दुष्टांचे करुनी निर्दालन
आलास आम्हा तू तारण्या
भक्तासाठी तुझी कीती रे अटाटी
उभा ठाकलास अठ्ठावीस युगे भक्ताच्या इच्छेपोटी
रंग तुझा सावळा
अंतरंगी नितळ
प्रेमाचा  झरा
शोभुनी दिसे रखुमाई संगे
विठुराया गं माझा सावळा
करण्या वारी पंढरीची
भक्तगण हे येती
दावण्या वैकुण्ठ  त्यांसी
उभा तू ठेवूनी हात कटी
जनन मरण माझे होवो तुझ्याच पोटी
नाम तुझे राहो सदा
माझ्या या ओठी

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे बदलापूर(पूर्व)

Comments