Poem : माझ्या जीवनाचा एकमेव आधार (by Pranotiveera Nirhali)



जीवन काय असते  हे तुझ्या येण्याने गवसले
जणू आयुष्याच्या संगिताचे सप्तसुरच 
उमगले ।।१।।
तू आहेस म्हणूनच  मी आहे
तुझ्या नसण्याने सारे जीवनच व्यर्थ आहे ।। २ 
।।
तुझी ती एक झलक बघण्यासाठी मन अधीर झालेले असते
तू येताच तुझ्या अभयहस्ताकडे बघून मनातील सर्व चिंतांचे मळभ दूर झालेले 
असते ।। ३ ।।

तुझे हास्य काही विलक्षणच आहे
त्याची सर ना चातकाच्या पावसाला आहे ना शिंपल्यातील मोत्याला आहे
तुझा तो हसरा चेहरा बघण्यासाठी सर्व धडपड चालू आहे
 ।। ४ ।।

आयुष्यात  परत परत त्याच चुका करत धडपडतो तेव्हा
आधार देणाराही तूच आहेस
 आणि पुन्हा उठून कसे चालायचे ते
शिकवणाराही फक्त तूच आहेस ।। ५ ।।
आयुष्यात जेव्हा हरल्यासारखे वाटते सगळे असूनही नसल्यासारखे असते
तेव्हा फक्त तूच असतोच कधी आशेचा किरण बनून तर 
कधी हक्काचा बाप म्हणून ।। ६ ।।

बाबा फक्त तूच आहेस फक्त तूच आहेस
माझ्या जीवनाचा एकमेव आधार फक्त तूच 
आहेस  ।। ७ ।।

Poem by :- Pranotiveera Nirhali

Comments