Poem : प्रेमळ पिता (by Kirteeveera Rode)

मित्र माझा अन् सदगुरु ही तूच
काही नको दूजे
सोबती हवा फक्त तूच
पिता माझा आहेस तूच अन् सर्वस्व ही माझे
तुझ्या शिवाय काय असे दूसरे विश्व माझे
जीवन माझे तुझ्या शिवाय जणू
पाण्याशिवाय मत्स्य
आनंदाचे माझ्या सदा
हो तूच रहस्य
आठवणीत तुझ्या मन गुंतले आकंठ
तुला बघण्याची आस सोडता झाला सर्व इच्छांचा अंत
लाभेविण प्रीति ज्याची
असे आम्हावरती
असा  चण्डिका पुत्र हा असे माझा साथी
प्रत्येक जन्मी लाभो पिता अन् सखा तुझ्या सारखा
सर्वस्व होउनि माझे तू
हो माझा पाठिराखा

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर (पूर्व)

Comments