Poem : प्रेमस्वरूप केवळ तो एकटाच... (by Sanketsinh Bhandari)



प्रेमस्वरूप केवळ तो एकटाच असतो!!!



मित्र तर हजारो बनतात,
पण सच्चा दोस्त, केवळ तो एकटाच असतो!!!

आप्त  तर अनेक असतात,
पण अवेळी धावून फक्त तो एकटाच येत असतो!!!

वाटाडे तर भरपूर  भेटतात,
पण उचित दिशेवर  फक्त तो एकटाच वळवत असतो!!!!

 मैत्री तर सगळेच निभावतात,
पण जीव ओवाळून फक्त तो एकटाच टाकत असतो!!!!

प्रेम स्वरूप मित्र केवळ तो अनिरुद्धच असतो , अनिरुद्धच असतो!!!!!!!

-----संकेतसिंह भंडारी 

Comments