बापुराया चिडलास का रे आमच्यावर
रागावलास का रे आपल्या बाळावर
काही चुकले का आमचे, मग ये आणि रागाव आम्हाला
कुठे दुखावले का आम्ही तुला, मग मार आम्हाला
हे जग खूप निष्ठूर झाले आहे रे
सगळीकडे नुसता अंधार दिसतो आहे रे
मन आता तुझिया एका कटाक्षासाठी आसुसले आहे
प्राण कंठाशी आला आहे, तुला एक वेळ नजर भरून पाहण्यासाठी
कान आसुसले आहे तुझे "हरि ओम ऐकण्यासाठी
डोळ भिरभिरत आहेत, तुझी एक smile बघण्यासाठी
ये ना बापुराया, दर्शन दे ना बापुराया
फक्त एकदाच, तुझी प्रेमळ नजर फिरव ना तुझ्या बाळांवर
फक्त एकदाच, तुझे हात उठू दे ना शुभार्शिवाद देण्यासाठी आम्हाला
फक्त एकदाच, तुझे चरण कमल डोळे भरून पाहू दे ना
ये ना बापुराया, ये ना एकदाच
- अंबज्ञ स्वातीवीरा अवसरकर
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback