Poem : ये पाहिजे तेव्हा अनिरुद्धा (by Dr. Nishikant Vibhute)


"ये पाहिजे तेव्हा अनिरुद्धा"

किती तुझी पायपीट.
माझे ते धावणे डोळे बंद करून.
तुझ्या जीवाची कासावीस नाही मी बघितली.
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

केवढे ते उत्सव,
सात-समुद्राचे पाणी एक करणे,
सर्वांचे प्रारब्धाचे खडे स्वतः पचवणे,
तुझे ते पापांचे गाठोडे मागणे,
डमरू वाजवत आमच्या पाठी चालणे..
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

आमचे संकटात तुझ्या नावाने धावा करणे,
तुझा तो त्रागा भक्त रक्षणासाठीचा
भक्तांचे त्रिविध ताप स्वतःवर घेणे
तरीही नित्य आंनदाचा वर्षाव करीतच राहणे..
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

श्रीमद्पुरुषार्थग्रंथराज तीन झाले
मातृवात्सल्य-उपनिषद
मातृवात्सल्य - विंदानम्
रामरसायन ....आम्हाला दिले
आणि संपूर्ण मानव जातीचा
सत्य ईतिहास... 
हरक्यूलससारखी
केवढी ती मेहनत बापुराया
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

दर गुरुवारचे तुझे येणे
कधी हसणे
कधी विरहाने रडणे
कधी बळेच राग आणणे
तरीही आमचे विक्षिप्त वागणे
रांग सोडून पुढे जाणे
तू नको सांगितले तेच खाणे
केवढे तू सहन करतोस रे..
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

तरीपण तुला आम्ही जाणतो
तू असाच आहेस, होतास आणि राहणार
जरी तू विश्राम घेत असशील
तरी आमचा विचार नाही सोडणार
तुझा प्रेमाचा वर्षाव असाच चालत राहणार
तू ऐकणार नाहीस तरीही सांगतो...
थकला असशील रे जरा..
घे विश्राम जरा अनिरुद्धा..

तू येतोस ... तुझ्या मर्जीने
आणि तुझी मर्जीच आमच्या हिताची

तुझी गती अनिरुद्ध
तुझी स्थिती अनिरुद्ध
तुझा विश्राम ही गतिशील
आणि गतीही विश्रामदायक

ये पाहिजे तेव्हा अनिरुद्धा
कारण तू येतोस पाहिजे तेव्हाच
नेहमीच तू येतोस योग्य वेळी अनिरुद्धा
नव्हे ...तुझ्या येण्यानेच वेळ योग्य होते

    ये पाहिजे तेव्हा अनिरुद्धा
         ये पाहिजे तेव्हा अनिरुद्धा

- डॉ निशिकांतसिंह विभुते

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback