Poem : आई तू माझी गोड गं (by Kirteeveera Rode)

आई तू माझी गोड गं
तुझ्याविना माझं दुसरं कोण गं

जवळ घेउनी आम्हा लेकरां मायेने कुरवळीसी
कुशीत तुझ्या घेऊन आम्हास संकटात रक्षीसी

समर्थपणे वावरण्या स्पर्धात्मक जगात या
आत्मबल देउनि करिसी
सक्षम तव लेकींस या

अहल्येगत न होण्यासाठी
समर्थ आम्हास तू करिसी
अस्तित्वाशी अनभिज्ञ लेकींस
ओळखण्या स्वतःस तू शिकविसी

हृदयाची ऐकुनी साद आमुच्या सत्वर तूच येसी
बाळांच्या रक्षणासाठी सदा
तत्पर तूच असशी

प्रेम माया हेच रूप तुझे
मातृत्व ही मोठे
जगत्पालन कार्यात तुझे
कर्तृत्व ही मोठे

केला प्रयास देण्या जन्मदिनी तुज शुभेच्छा
गोड मानूनी घ्याव्यास तू हीच तुझ्या लेकीची इच्छा

Poem by:
किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments