Poem : आई माझी कोणाला पावली गो... (by Sanketsinh Bhandari)


आई माझी कोणाला पावली गो नंदामाई  गो कुणाला पावली ?
पावली भोळ्या भाविकांना गो , भोळ्या भाविकांना !!१।।
आई माझी  भक्तांसाठी उभी ग आई माझी भक्तांसाठी उभी ,
आई तुझी नंजर लेकरांवरी ग , बापूंच्या भक्तांवरी .॥१।।
आई तुला भक्तीची आवड ग आई तुला सेवेची आवड
आई तुला काळजी घेण्याचा छंद ग, आमची काळजी घेण्याचा छंद ।।२।।
आई आम्हा संकटी तू रक्षिसी ग आई आम्हा संकटी तू रक्षिसी
आई आम्हा तूच ग तारिसी ग , तूच वाचविसी ।।३।।
नंदाई कोणाला पावली ग नंदाई कोणाला पावली ,
पावली बापूंच्या भक्तांना गो, श्रद्धावान भक्तांना !!४।।
--- संकेतसिंह भंडारी ,

Comments