Poem : असाही एक नंदाईचा वाढदिवस (by Santoshsinh Rane)


संदुकीची कडी उघडता
कुजबूज आली कानी
संदुकीतच आनंदाचे भरते
चालली नंदाईची गाणी
गोधडीचे ते मंजुळ स्वर....
माझ्या पाठीवर नंदाईची माया
तिच्याच कोमल स्पर्शाने
झाली उबदार माझी काया
आईचं बाळ जणू कुशीत निजलं
नंदाईच्या स्पर्शात जीवन फुललं
नऊवारीने धरीला फुगड्यांचा फेर
आईच्या हातात, सजते मी लाडात
आज्जीबाईंच्या आनंदात, गोड़ हसू गालात
आज्जीबाईंच्या हसण्याने, येती अंगावर शहारे
नंदाईच्या प्रेमाचे, माझ्या पदराला किनारे
बाहुलीबाई इकडून तिकडे
फेर धरून गाई आनंदाचे गाणे
किती बाई मी लाडाची!
नंदाईची गोड़-गोड़ राणी!!
बघा माझी वेणी-फणी
करते गावाकडची चिमुकली राणी
नंदाईच्या कृपेने चाले माझाही श्वास
तुझेच गुण गाऊनी ती तुझी लेक
भरवते मजला घास
 
स्वेटर दादा म्हणे नम्रतेने
मी कसला उबदार
नंदाईचा हात पाठीवर माझ्या पडतसे हळूवार
लेकरांच्या अंगावरी तुझ्याच आशीर्वादे राहतो
थंडीच्या त्या रात्री आई
तुझ्या अंगाईचा स्वर कानी येतो
चप्पल, टोपी, गणवेश यांच्या
आनंदा आले भरते
नंदाईच्या स्मरणानंतर
पाऊल शाळेकडे वळते
वरती ऊन, खाली दगड-काटे
नंदाईची माया दूर सारी दुःखाचे काटे
माचीस आणि मेणबत्ती ताई
फार ह्यांची चालली घाई
विद्येसाठी हवा प्रकाश
नंदाईच्या प्रेमापुढे ठेंगणे आकाश
आईच्या नजरेतून मिळवली माया
अंधारी जीवनी चला झिजवू काया
अंधारातून प्रकाशाकडे, गुरुकृपेचे गिरवू धडे
चला मिळून सारे जन  
आईचा वाढदिवस साजरा करू आपण
साऱ्यांनाच झाली होती घाई
मुखी नाम जपे आई-आई-आई
सजीव-निर्जिव ना भेद राहिला
बापूंच्या कलम संदुकीत मज सर्व अर्थ गवसला
अहंकार सर्व विरून गेला
गुरुकृपेच्या प्रेमात सेवेचा खरा अर्थ गवसला
 
निर्जीव निरागस वाटणारे शब्द
हरवून गेलेत माझे शब्द, उरली शाई
आई त्यात माझ्या इवल्या इवल्या
शुभेछांसी तू सामावून घेई
 
काय देऊ तुज आज मी
स्मरतो बापूकृपेने..... 
आई.... आई.... आई...  
अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे

Comments