बापू फक्त तू......
दरदर फिरत राहिलो बापू आणि,
तुझ्याचपाशी आलोय परतुनि.....
भरकटलो मी जरी,दिशाहीन झालो जरी,
तरी तूच माझा सांगाती बापू तूच माझ्यापाशी....
चुकत गेल सगळच माझ पण
बापू तू प्रत्येक वेळी घेतलस सावरून....
तुटलोय मी रे सर्व बाजूंनी पण
तु दिलेल्या भक्तिमार्गावर खंबीर आहे कायम.....
मनात येतात भेडसावणारे खुप काही विचार
तुझे नाव घेताच ते ही जातात पळून दूर फार....
कधी कधी नकोस वाटत सार काही पण
तुझ्या कृपेचा आहे वरदहस्त माझ्या शिरावरी....
म्हणूनच सुखी आहे मी तुझ्या चरणतळी....
दुनियेच्या या भोवळ्यात एकटे पडतो पण
तू दिलेल्या अंबज्ञतेने पुन्हा उठून उभे राहतो....
देवा तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
नाहीतर सार काही व्यर्थच होते.....
माझा श्वास,माझा ध्यास तूच रे बापुराया,
सार काही निर्रथक आहे देवा तुझ्यावीना....
सोडव मला या सर्व मोहमाया नगरीतुन
आणि सामावून घे मला संपूर्ण,
तुझ्या भक्तिरंगात
तुझ्या भक्तिरंगात.....
स्वप्नालीवीरा आग्रे.
Ambadnya
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback