बापू तू ये ना......
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना
तुझी वाट पाहतापाहता धीर सुटतोय ना..
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
तुझ्या चेहऱ्याची प्रसन्नता मला पाहू दे ना..
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
माझ्या "राजांनो" हा शब्द ऐकण्यासाठी कान आतुरलेत ना..
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
आमच्यासाठी असलेले तुझ्या डोळ्यातले प्रेम मला पाहू दे ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
तुझ्या चरणांशी घट्ट मीठी मला मारू दे ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
प्रत्येकक्षणी बापू तू माझ्या ध्यानी मनी रहा ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
प्रवचनातून सुटलेली जीवनाची कोडी पुन्हा सोडवायला ये ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
डोळे भरून येता आसव काही थांबेना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
मनाचा गोंधळ माझ्या हल्ली फार उड़तोय ना..
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
नको ना असा दूर राहुस की जीव कासाविस होतो ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
कधी येशिल,कधी दिसशील या विचाराने मन शांत नाही ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
जय जगदंब जय जगदंब म्हणत तुझे थिरकनारे पाऊल पाहून..., मला ही बेभान पुन्हा व्हायचं ना...
बापू तू ये ना अन् जवळ मला घे ना,
बाबा तुला लेकिची ओढ़ कळतेय ठाऊक आहे रे तरी पण ना...
आता तरी तू ये ना रे अन् मला जवळ घे ना रे...
वाट पाहतेय तुझी लाडकी लेक बाबा....
लवकर तू ये ना....
लवकर तू ये ना.....
लवकर तू ये ना......
- स्वप्नालीवीरा आग्रे
----------------
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback